R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची केंद्रीय नितीन गडकरी यांनी घेतली पुण्यात भेट

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची केंद्रीय नितीन गडकरी यांनी घेतली पुण्यात भेट

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात पुणे विमानतळावर बैठक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार गिरीश बापट, सुनील तटकरे आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांची भेट घेतली.

या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना म्हटले, मुंबई-गोवा महामार्गाची जी काही चाळण झाली आहे त्यामध्ये पळसपा ते इंदापूर हा रस्ता खाजगीकरणाच्या माध्यमातून विकसित होत आहे. त्या ठिकाणी डंबरीकरणाऐवजी काँक्रिटीकरणाचं काम घेण्यात यावं. त्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी अधिक लागेल. असं मी गडकरींसमोर मत मांडलं. यावर गडकरींनी ५ ऑक्टोबर रोजी एक उच्चस्तरीय बैठक दिल्लीत आयोजित केली आहे. यावेळी पनवेल – इंदापूर महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला व पुण्यातील इतर विकासकामांविषयी चर्चा केली.

मंत्री नितीन गडकरी कामाचा धडका लावत देशभरात रस्ते विकासाचे जाळे पसरवले आहे. परंतु, त्यांच्या जिल्ह्यातील नागपूरमध्ये रस्ते दुरुस्त न केल्याच्या कारणावरून एका इसमाने गडकरी यांच्या घरोसमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विजय पवार असं पीडित व्यक्तीचे नाव आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

नवाब मलिक यांच्याकडे समीर वानखेडेंच्या विरोधात पुरावे असतील

  मुंबई | अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला एनसीबी अटक केल्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती तसेच राज्याच्या राजकारणात सुद्धा एकाच खळबळ माजली होती. त्यातच...

‘नुसते मंत्रालय म्हणू नका, ते तर बंद आहे’ नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

  मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीयांनी ठाकरे परिवार आणि शविसेना पक्षावर घणाघाती टीका केलेली दिसून आहे. त्यातच मालवण येथे केलेल्या विधानावरून...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments