R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या पायाला फ्रॅक्चर असतानाही केले शूटींग

अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या पायाला फ्रॅक्चर असतानाही केले शूटींग

 

अभिनेता अमिताभ बच्चन सध्या सोनी टीव्हीवरील ‘कौन बनेगा करोडपती’च्या १३ व्या सीजनचे सूत्रसंचालन करीत आहेत. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांचा उत्साह तरुणाईला लाजवेल असाच आहे. नुकतीच त्यांच्या पायाला दुखापत झाली असून पायाची बोटं फ्रॅक्चर झाली आहेत. अशा अवस्थेतदेखील आराम न करता शो मस्ट गो ऑन… म्हणत ते केबीसीच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहेत.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. नुकताच त्यांनी आपल्या ब्लॉगवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात त्यांच्या पायाच्या बोटांना फ्रॅक्चर झाल्याचे दिसतेय. ‘पायाची बोटं फ्रॅक्चर झाली आहेत. असह्य वेदना होतायत. ठिक होण्यासाठी चार ते पाच आठवडय़ांचा वेळ लागेल,’ असे त्यांनी ब्लॉगमध्ये म्हटलंय.

काही दिवसांपूर्वी नुकतेच बिग बी यांनी नवरात्री विशेष भागाचे शूटिंग केले आहे. त्यात ते सूटऐवजी ट्रेडिशनल लूकमध्ये दिसतायत. तसेच बोटांना झालेली जखम लपवण्यासाठी त्यांनी केमोफ्लाज शूज घातले आहेत. ब्लॉगमध्ये बिग बी म्हणाले, ‘पायाच्या फ्रॅक्चर बोटांच्या सुरक्षिततेसाठी केमोफ्लाज शूज. दिसायला मौजांसारखेच, मात्र आहेत शूजच…तुटलेल्या बोटांसाठी ही कोमल सुरक्षा. असा ब्लॉगमध्ये लिहिले आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

समीर वानखडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर पत्नी क्रांती रेडकर म्हणते की,

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर वानखडे मुंबई क्रुझ रेव्ह पार्टीवर छापेमारी करताना अटक केली आहे. आर्यन खान याला ड्रग्जचं सेवन करत असल्याचा आरोप एनसीबी'ने...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृह होणार सुरु, मात्र पाळावे लागणार हे नियम

  मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह मागच्या दीड वर्षांपासून सुरक्षितेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आली होती. या निर्णयामुळे या क्षेत्रातील निवडीत असलेल्या...

अमीर खानच्या CEAT टायर जाहिरातीवर भाजप खासदाराने घेतला आक्षेप

  मुंबई | अभिनेता अमीर खान यांची CEAT तयार कंपनीबरोबर केलेली जाहिरात सध्या वधाच्या भोवऱ्यात सापडली असून या जहरातीवर भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

Recent Comments