R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या नगर जिल्ह्यासाठी तीन मोठ्या घोषणा, गडकरी म्हणतात मला महाराष्ट्राचा PWD मिनिस्टर झाल्यासारखा...

नगर जिल्ह्यासाठी तीन मोठ्या घोषणा, गडकरी म्हणतात मला महाराष्ट्राचा PWD मिनिस्टर झाल्यासारखा वाटतंय !

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यात आज ३ हजार २८ कोटींच्या महामार्गाचं भूमीपूजन तर १ हजार ४६ कोटींच्या महामार्गाचं लोकार्पण झालं. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विखे परिवार एकाच मंचावर उपस्थित होते. तसेच पालकमंत्री हसन मुश्रिफ, माजी मंत्री राम शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी गडकरी यांना अनेक आमदारांनी रस्त्यांच्या कामांबाबतची निवेदनेही दिली. ही निवेदने घेतल्यानंतर गडकरींनी या आमदारांना मिष्किलपणे टोलाही लगावला. आमदारांनी बरीच निवेदने दिली. असं वाटतं, मी महाराष्ट्राचा PWD मिनिस्टर झालो, असं नितीन गडकरी यांनी मिष्किलपणे म्हटलं.

नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज नगरमध्ये होते. यावेळी विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आलं. त्यानंतर नितीन गडकरींनी नगरकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत मिष्किल भाष्य केलं. मला बरेच निवेदनं आमदारांनी दिले. त्यामुळे मला प्रश्न पडलाय की महाराष्ट्राचा पीडब्ल्यूडी मिनिस्टर आहे का? तुम्ही दोन-दोन, चार-चार, पाच-पाच किलोमीटरच्या रस्त्यांच्या सीआरएफची लिस्ट मला द्याल तर मी कुठून काम करेल? मला भेटायला दिल्लीत येतात. मुंबईत येतात. पण कमी लांबीच्या रस्त्यांची कामे घेऊन येतात. त्यापेक्षा मोठ्या रस्त्यांची कामे घेऊन या, असं गडकरी म्हणाले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

नाशिक महानगर पालिका जिंकण्यासाठी संजय राऊतांची मोर्चेबांधणी सुरु

  नाशिक | नाशिक मनगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऑर्डर तयारी सुरु केली आहे तसेच इतर सर्वच राजकीय...

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

नाशिक महानगर पालिका जिंकण्यासाठी संजय राऊतांची मोर्चेबांधणी सुरु

  नाशिक | नाशिक मनगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऑर्डर तयारी सुरु केली आहे तसेच इतर सर्वच राजकीय...

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

Recent Comments