R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश कोस्टल रोडच्या कामावर १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा "तवंग"

कोस्टल रोडच्या कामावर १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा “तवंग”

 

मुंबई | मुंबईकरांसाठी बांधण्यात येणाऱ्या कोष्टल रोडच्या कामात १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग आताचा दिसू लागाला आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने कंन्टल्टनला काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि या अपहाराची व लुटमारीची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन कोस्टलरोड मधील भ्रष्टाचार उघड केला. यापुर्वी त्यांनी ६ सप्टेंबरला पत्रकार परिषद घेऊन कोस्टल रोडच्या कामात १००० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा अरोप केला होता. त्याला तातडीने त्याच दिवशी मुुंबई महापालिकेने खुलासा करून उत्तर दिले होते. या खुलाशामध्ये महापालिकेने, या कामात कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार व अनियमीतता न झाल्याचा दावा केला होता. त्यावर आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आमदार अँड आशिष शेलार यांनी पुराव्यासहित या कामात कसा भ्रष्टाचार होतोय हे उघड केले.

याबाबत बोलताना ते म्हणाले की, कोस्टल रोड हा भाजपाचा ड्रिम प्रकल्प असून मुंबईला त्याची गरज आहे म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या परवानग्या तातडीने मिळवून दिल्या. त्यानंतर मात्र ज्या पध्दतीने काम सुरू आहे त्यावरून कामाचा दर्जा निष्कृष्ट दर्जाचे असून या प्रकल्पाचे भवितव्यच धोक्यात आले आहे. या प्रकल्पाला भाजपाचा विरोध नसून यातील भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे असे सांगत त्यांनी आजची पत्रकार परिषद घेतली.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

आर्थररोड जेलमध्ये शाहरुखनंतर ‘ही’ व्यक्ती पोहचली आर्यनच्या भेटीला

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी शाहरुख त्याला जेलमध्ये भेटायला गेला होता. आता बातम्या येत...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

ठाकरे सरकारला जरा जरी लाज असेल तर, भाजपच्या या आमदाराची घणाघाती टीका

  मुंबई | सध्या भारतात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असून अनेक शेतकरी आक्रमक होऊन आपल्या हक्कासाठी आंदोलन देखील करत आहेत. अशातच पंढरपूरचे आमदार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्थररोड जेलमध्ये शाहरुखनंतर ‘ही’ व्यक्ती पोहचली आर्यनच्या भेटीला

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी शाहरुख त्याला जेलमध्ये भेटायला गेला होता. आता बातम्या येत...

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments