R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या उद्यापासून तीन तासांची शाळा, गुलाब देऊन करणार विद्यार्थ्यांचे स्वागत

उद्यापासून तीन तासांची शाळा, गुलाब देऊन करणार विद्यार्थ्यांचे स्वागत

 

मुंबई | राज्यात ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यात येणार असून तब्बल दीड वर्षानंतर प्रथमच वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी शाळांनी सुरू केली आहे. सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी दररोज टप्प्याटप्प्यात विद्यार्थ्यांना बोलाविण्याचे काही शाळांनी ठरविले आहे. बऱ्याच शाळांनी तीन तासांचे नियोजन केले असून दिवसाच्या सुरुवातीला दहावीच्या विद्यार्थ्यांची शाळा होणार आहे.

त्याचप्रमाणे नववी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना बोलाविण्याचा मुख्याध्यापकांचा विचार आहे. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी पहिल्या आठवडय़ात वर्गात प्रत्यक्ष अभ्यास होणार नाही. पहिल्या आठवडय़ात अभ्यास होणार नसला तरी अनेक शाळांनी पूर्व नियोजित सहामाही परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला असल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची तयारी असल्याचे शाळांचे म्हणणे आहे.

पालकांनी आपल्या पाल्याला मास्क व स्वच्छ रूमाल देऊन बिनधास्त शाळेत पाठवावे. शाळेतील प्रत्येक वर्गखोली स्वच्छ धुऊन पुसून सॅनिटायझर केलेली आहे. वॉशबेसिनमध्ये हॅण्डवॉश आहेत. फिजिकल डिस्टन्सवरच विद्यार्थी बसण्याची सोय आहे. वर्गात प्रवेश करताना फूट सॅनिटायझर मशीनद्वारे हात स्वच्छ करण्यात येतील. विद्यार्थ्यांना काहीही त्रास जाणवला तरी त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात येईल. त्याआधी पालकांना कल्पना दिली जाईल. महत्त्वाचे म्हणजे खासगी इंग्रजी शाळांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांनी कोरोना प्रतिबंधक दोन्ही लसी घेतल्या आहेत अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

Recent Comments