R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड शाहरुख खानचा मुलगा आर्यन ड्रग्ज केसप्रकरणी एनसीबी'च्या ताब्यात,

शाहरुख खानचा मुलगा आर्यन ड्रग्ज केसप्रकरणी एनसीबी’च्या ताब्यात,

 

मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर एनसीबी’ने शनिवारी रात्री छापा मारला. या कारवाईत एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये काही सेलिब्रेटी तसेच त्यांची तरुण मुले यांचा समावेश असल्याचे समजते. कोकेन, चरस, एमडी, गांजा आदी मादक पदार्थ अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. एनसीबीची रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. ही त्यांच्यात ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई पथकाला मिळाली होती.

या कारवाईत पकडण्यात आलेल्या मुलांमध्ये सिनेमानेत शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला सुद्धा पकडण्यात आल्याची माहिती TV9 मराठी या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली आहे. या वृत्तामुळे सिनेक्षेत्रात एकच खळबळ उडाली असून यावर अद्याप काहीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉर्डेलिया या २००० प्रवासी क्षमतेच्या जहाजावर मुंबई-गोवा-मुंबई ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते. या क्रूझवर उच्चभ्रू वर्गीयांचा प्रामुख्याने समावेश होता. . शनिवारी रात्री गोव्याला जाऊन ते सोमवारी सकाळी परत मुंबईला येणार होते. त्यासाठी आयोजकांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागविले होते. एनसीबीच्या पथकाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून क्रूझ ग्रीन गेटजवळ थांबले असताना छापा मारल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘मी चांगला वडील नाही’, आर्यनच्या प्रकरणानंतर शाहरुख खानने व्यक्त केली खंत

  अभिनेता शाहरुख गेल्या काही दिवसांपासून पुत्रआर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे खूप चर्चेत आला आहे. गुरूवारी झालेल्या सुनावणीनंतर आर्यनला आता आणखी पाच दिवस तुरूंगात राहावे लागणार...

एनसीबी’ने निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरी केली छापेमारी, कार्यालयाची घेतली झाडाझडती !

  मुंबई | क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. एनसीबी'ने आता चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या बांद्रा येथील घरावर आणि कार्यालयावर छापा...

आर्यनच्या अटकेनंतर बहीण सुहाना खान हिने ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी लढवली ही शक्कल

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत पाठवण्यात आले आहे. एनसीबीने आर्यनला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावरील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments