R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ठाकरे सरकार गप्प का बसलंय, भूमिका घ्यायला हवी, तसं वाटत नसेल तर...

ठाकरे सरकार गप्प का बसलंय, भूमिका घ्यायला हवी, तसं वाटत नसेल तर दुर्दैव प्रथमच राऊतांची पक्षाविरोधात भूमिका

 

मुंबई |  भाजपने बेळगाव महानगरपालिकेवर सत्ता स्थापन केली असून पुन्हा एकदा आता कानडी सरकारने केलेल्या भाषिक जनगणनेत मराठी भाषिकांची संख्या कमी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बेळगावात फक्त १५ टक्के मराठी भाषिक असल्याचा अजब निष्कर्ष कर्नाटक सरकारने काढला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. या प्रकरणी ठाकरे सरकार गप्प का बसले आहे. भूमिका घ्यायला हवी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सीमाभागातील मराठी भाषिकांचा लढा कमकुवत करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला आहे. तसेच याविरोधात आपल्याला कोर्टात जावे लागेल, असेही सतेज पाटील यांनी म्हटले आहे. यावर संजय राऊत यांनी भाष्य करत आपले म्हणणे स्पष्ट केले आहे. बेळगावमध्ये ६० ते ६५ टक्के मराठी बांधव आहेत आणि ती संख्या कायम आहे. फक्त कर्नाटकने राजकीय स्वार्थसाठी त्या संपूर्ण भागाचे कानडीकरण करून मराठी टक्का कमी करण्याचा प्रयत्न केला. तरीही सीमाभागातील बहुमत हे मराठी आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

बेळगाव महापालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला असला तरीही मराठी उमेदवारांना पडलेली मते भाजपपेक्षा अधिक आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेला भाजप सत्तेवर आला आहे. मराठी भाषिक अल्पसंख्याक आहेत, असे म्हणत असतील तर ते अत्यंत खोटे आहे. याच्यामागे काहीतरी डाव आहे. महाराष्ट्र सरकारने यावर भूमिका घ्यायला हवी. राज्य सरकार गप्प का बसले आहे, हे मला कळत नाही असे राऊत यांनी विधान करून पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

“हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे”

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याबाबत मुलीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

“हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे”

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याबाबत मुलीच्या...

Recent Comments