R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱयांना चिरडले, उत्तरप्रदेशात उडाली एकाच खळबळ

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱयांना चिरडले, उत्तरप्रदेशात उडाली एकाच खळबळ

 

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने रविवारी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखवणाऱया शेतकऱयांच्या अंगावर गाडी घातली. यात आठ शेतकरी ठार झाले असून आणखी ८ ते १० शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या0 कृत्यानंतर शेतकऱयांच्या संतापाचा प्रचंड उद्रेक झाला. शेकडोंच्या जमावाने मिश्रा यांच्या मुलाच्या गाडीसह इतर दोन गाडय़ा पेटवून दिल्या.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य हे एका कार्यक्रमासाठी लखीमपूर खीरीला पोहोचले होते. त्यांच्या दौऱयाची माहिती मिळताच शेतकरी रविवारी सकाळी ८ वाजताच हेलिपॅडवर पोचले होते. दुपारी मिश्रा यांच्या गाडय़ांचा ताफा रस्त्याने चालला असताना शेतकऱयांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. हे पाहून अजय मिश्रांचा मुलगा अभिषेकचा पारा चढला व त्याने आपली गाडी शेतकऱयांच्या अंगावर घातली.

या अतिरेकानंतर शेतकऱयांनी अभिषेकच्या गाडीसह ताफ्यातील इतर दोन गाडय़ांची जाळपोळ केली. अभिषेकची गाडी रोखण्याच्या प्रयत्नात महिला शिपाईसह 2 पोलीस जखमी झाले. घटनेचे राजकीय वर्तुळातही तीव्र पडसाद उमटले असून या घटनेतून भाजप सरकारच्या हुकुमशाही व क्रूरतेचे दर्शन घडल्याची टीका विरोधकांनी केंद्र सरकारवर केली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी सोमवारी लखीमपूरला भेट देणार आहेत. घटनेनंतर परिसरातील इंटरनेट सेवा बंद केली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्थररोड जेलमध्ये शाहरुखनंतर ‘ही’ व्यक्ती पोहचली आर्यनच्या भेटीला

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी शाहरुख त्याला जेलमध्ये भेटायला गेला होता. आता बातम्या येत...

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments