R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home देश "लाठ्या-काठ्या उचला. आक्रमक शेतकऱ्यांना तुम्हीही त्याच भाषेत उत्तर द्या" मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर...

“लाठ्या-काठ्या उचला. आक्रमक शेतकऱ्यांना तुम्हीही त्याच भाषेत उत्तर द्या” मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांचे वादग्रस्त विधान

 

केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या दीड वर्षांपासून केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. अशातच आता आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेल्या एका विधानामुळे खळबळ उडाली असून, यावरून विरोधकांनी आक्रमक होत टीका केली आहे. शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, जशास तसे उत्तर द्या, असे आक्षेपार्ह वक्तव्य मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे. ते रविवारी प्रसार माध्यमंही बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

या विधानानंतर विरोधकांनी आक्षेप नोंदवत खट्टर सरकारवर निशाणा साधला आहे. तर संयुक्त किसान मोर्चानेही टीका करत या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. मनोहर लाल खट्टर म्हणाले की, प्रत्येक भागात ५०० ते एक हजार कार्यकर्त्यांची फळी उभी करा. तेच शेतकऱ्यांना जशास तसे उत्तर देतील, असे खट्टर यांनी म्हटले आहे. लाठ्या-काठ्या उचला. आक्रमक शेतकऱ्यांना तुम्हीही त्याच भाषेत उत्तर द्या. शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते. आम्हीही पाहून घेऊ. दोन-चार महिने कारागृहात राहून बाहेर आलात की तुम्हीही नेते व्हाल. जामिनाची काळजी करू नका, असे खट्टर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही या वक्तव्यासंदर्भात घणाघाती टीका केली आहे. राज्याचा मुख्यमंत्री हिंसाचाराला प्रोत्साहन देत असेल, कायदा-सुव्यवस्था समाप्त करण्याची गोष्ट करत असेल, तर संविधानानुसार शासन कसे चालणार, असा सवाल करत भाजप शेतकरी विरोधी असल्याचे यामुळे उघडकीस आले आहे. भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला गुरुमंत्र यशस्वी होणार नाही, या शब्दांत सुरजेवाला यांनी खट्टर सरकारवर निशाणा साधला आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतं, काँग्रेसची जळजळीत टीका

  सध्या कर्नाटकात पोट निवडणुकीच्या जोरदार प्रचार सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडायला सुरवात केली आहे. मात्र आता या पोट निवडणुकीच्या...

” देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये.” केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे.

  राज्यातील वीज उत्पादन संकटास केन्द्र सरकारकडून कोळसा पुरवठा होत नसल्याचे कारण देऊन करण्यात येत असलेल्या आरोपात अजिबात सत्यता नाही. केन्द्र सरकारने राज्य सरकारला पावसाळा...

केंद्रात मंत्री असूनही नारायण राणे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान नाही

  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून आपली नवी टीम जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, माजी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments