R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या बैठीकीनंतर युवा सेना कल्याण पूर्व शहराध्यक्षाला मारहाण

युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या बैठीकीनंतर युवा सेना कल्याण पूर्व शहराध्यक्षाला मारहाण

 

कल्याण | कल्याण पूर्व येथे शनिवारी युवा सेना सचिव वरूण देसाई यांनी पदाधिकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. मात्र मुलाखती गेटल्यानंतर सरदेसाई निघून गेल्यानंतर कल्याण पूर्वेतील युवासेना अध्यक्षाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे ही मारहाण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचे आरोप युवा सेना शहर अध्यक्षांनी केल्याने पक्षातील वाद चव्हाट्यावर आले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून युवासेना सचिव वरूण सरदेसाई कल्याण लोकसभेत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान सरदेसाई यांनी युवा सेनेत पदांसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची मुलखाती घेतली. शनिवारी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात शिवसेना शाखेत सरदेसाई यांनी कार्यकर्त्यांचा मुलाखती घेतल्या. कल्याण पूर्वचे युवासेना अधिकारी संजय मोरे हे वरूण सरदेसाई यांना भेटण्यासाठी आले होते.

मात्र या भेटीनंतर संजय मोरे हे आपल्या घरी जात असताना शिवसेना शाखेच्या पाठीमागे पायी जात असताना मोरे यांना मारहाण करण्यात आली. संजय मोरे यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात मोरे यांनी तक्रार अर्ज स्थानिक पोलिस स्टेशन, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आणि पक्षातील नेत्यांना देऊन न्यायाची मागणी केली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

“मी शिवसेनेत होतो तेव्हा ते खासदार सुद्धा नव्हते, भुजबळांनी लगावला टोला

  नाशिक | नाशिक येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावला होता....

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

Recent Comments