R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या रिपब्लिकन पक्षाला एका जातीपुरता सिमीत ठेवणार नाही, रामदास आठवले यांची विधान

रिपब्लिकन पक्षाला एका जातीपुरता सिमीत ठेवणार नाही, रामदास आठवले यांची विधान

 

मुंबई | बाबासाहेबांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला रिपब्लिकन पक्ष एका जातीपुरता व गटातटात विभागल्याने प्रभावहीन झाला. पक्षाला उभारी देण्यासाठी पक्षाला एका जातीपुरता सिमीत न करण्याची प्रतिज्ञा रिजेन्सी अंटेलिया हॉल मध्ये आयोजित केलेल्या पक्षाच्या ६४ व्या वर्धापनदिनी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केली. त्यामुळे आता येणाऱ्या दिवसात रिपब्लिकन पक्ष इतर समजला सुद्धा आपल्यात सामावून घेणार आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यापक संकल्पनेतून उभा राहिलेला रिपब्लिकन पक्ष कमी-अधिक प्रमाणात यशस्वी झाला. मात्र पक्षातील गटतटाच्या राजकारणामुळे पक्ष प्रभावहीन झाला असून एका जातीपुरता सीमित झाला. पक्षाला उभारी देण्यासाठी पक्ष एका जाती पुरता सीमित ठेवला जाणार नसल्याची प्रतिज्ञा केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी पक्षाच्या ६४ व्या वर्धापनदिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात रिजेन्सी अंटेलिया हॉल मध्ये केली.

रिपब्लिकन पक्षाची येणाऱ्या महापालिकेसह अन्य निवडणुकीत भाजप सोबत युती राहणार असल्याचे यावेळी आठवले यांनी स्पष्ट केले. सबका साथ, सबका विकास या तत्वावर देश प्रगतीच्या शिखरावर नेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे खरे कैवारी बनल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, त्यामुळे तीन पक्षाचे तीन तिगाडी सरकार केंव्हाही जाण्याचे संकेत दिले.

राज्यात भाजप-शिवसेना-रिपाइं यांची भविष्यात युती झालेली दिसेल. तसेच राज्यातील रस्ते खड्डयात गेले नसून राज्य सरकार खड्डयात गेल्याचे ते म्हणाले. महिला व दलितांवर अत्याचार वाढल्याची टीकाही त्यांनी केली. डोंबिवलीतील पीडित मुलीसह कुटुंबाची भेट घेऊन पक्षाच्या वतीने कुटुंबाला १ लाखाची मदत देऊन, मुख्यमंत्री यांनीं २० लाखाची मदत द्या. अशी मागणी करणार असल्याचे आठवले म्हणाले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments