R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या संजय राऊत यांनी मोदी-शाह यांच्यावर केलेल्या टीकेचा फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार

संजय राऊत यांनी मोदी-शाह यांच्यावर केलेल्या टीकेचा फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार

 

मुंबई | खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सामना अग्रलेखातून टीका केली होती. तसेच मोदी -शाह यांच्यावर सुद्धा उत्तरप्रदेश येथे घडलेल्या घटनेवरून निशाणा साधला होता. आता राऊत यांच्या या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे. संजय राऊत हे ऑफिसच्या एसीत बसून मोठे लीडर झाले आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

संजय राऊतांनी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी पाहणी दौरा करताना राजकारण केलं असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. फडणवीस उस्मानाबाद, लातूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा करत आहेत. फडणवीस उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करतील. लातूरमध्ये फडणवीस यांनी माध्यमांशी संवास साधला आहे. यावेळी फडणवीस यांनी राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कार्यालयात बसून टीका करतात. अग्रलेख लिहून नेते होतात त्यांना शेतकऱ्यांचे दुःख काय माहिती. हे ऑफिसमधील एसीत बसलेले मोठे लीडर, त्यांना काय उत्तर द्यायाचे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

Recent Comments