R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड आर्यनला चार वर्षापासून ड्रग्स घेण्याची सवय? शाहरुखच्या बंगल्याची NCB घेणार झाडाझडती

आर्यनला चार वर्षापासून ड्रग्स घेण्याची सवय? शाहरुखच्या बंगल्याची NCB घेणार झाडाझडती

 

मुंबई | अभिनेता शाहरुख खान याचा मोठा मुलगाआर्यन खान सध्या चर्चेत असून एनसीबीने ड्रग्स प्रकरणात त्याला अटक केली आहे. ड्रग्जचं सेवन, विक्री आणि ड्रग्ज सोबत बाळगल्या प्रकरणी एनसीबीनं त्याला ताब्यात घेतलं आहे. आज आर्यनला जामिन मिळण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे त्याच्या बऱ्याच गोष्टींचा खुलासा होत असलेला पहायला मिळतोय.

एनसीबीनं ड्रग्स प्रकरणी आर्यनची चौकशी केली. या चौकशीमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा झाल्याचं समोर आलं आहे. एनसीबीनं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आर्यननं दिली आहेत. यावेळी आर्यननं चार वर्षापासून ड्रग्स घेत असल्याची कबूली दिली आहे. त्याच्या सोबत त्याच्या जवळचा मित्र अरबाज मर्चंटही सतत ड्रग्ज घेत असल्याचं समोर आलं.

आर्यननं भारतासह युके, दुबई अशा अनेक देशांमध्ये ड्रग्जचं सेवन केल्याचं चौकशीत समोर आल आहे. चौकशी दरम्यान एनसीबीनं आर्यनला शाहरुख सोबत बोलण्यास दिलं होतं. दोन मिनिटांसाठी बोलायला दिलं असताना आर्यन ढसा-ढसा रडला. चौकशीमध्येही तो रडत असल्याचं समोर आलं. आर्यननं दिलेल्या माहितीनुसार त्यानं ड्रग्जही सोबत ठेवले होते. त्यामुळे आता एनसीबी शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची झाडाझडती घेणार असल्याचं समजत आहे. यासाठी एनसीबीनं एक टीमही तयार केली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

समीर वानखडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर पत्नी क्रांती रेडकर म्हणते की,

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर वानखडे मुंबई क्रुझ रेव्ह पार्टीवर छापेमारी करताना अटक केली आहे. आर्यन खान याला ड्रग्जचं सेवन करत असल्याचा आरोप एनसीबी'ने...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृह होणार सुरु, मात्र पाळावे लागणार हे नियम

  मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह मागच्या दीड वर्षांपासून सुरक्षितेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आली होती. या निर्णयामुळे या क्षेत्रातील निवडीत असलेल्या...

अमीर खानच्या CEAT टायर जाहिरातीवर भाजप खासदाराने घेतला आक्षेप

  मुंबई | अभिनेता अमीर खान यांची CEAT तयार कंपनीबरोबर केलेली जाहिरात सध्या वधाच्या भोवऱ्यात सापडली असून या जहरातीवर भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्थररोड जेलमध्ये शाहरुखनंतर ‘ही’ व्यक्ती पोहचली आर्यनच्या भेटीला

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी शाहरुख त्याला जेलमध्ये भेटायला गेला होता. आता बातम्या येत...

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments