R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या लखीमपूर हिंसाचार; अखिलेश यादव यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

लखीमपूर हिंसाचार; अखिलेश यादव यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेशमध्ये घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण देशात मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकार विरोधात संतापाची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे बडे-बडे नेते आता उत्तरप्रदेशात दाखल होत आहेत. त्यातच या प्रकरणी घटनास्थळी जाण्यासाठी निघालेल्या समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील भेट घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्यांना पोलिसांनी स्थानबद्द करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस बंदोबस्त अखिलेश यांच्या निवासस्थानाबाहेर ठेवण्यात आला आहे. अखिलेश यांना रोखण्यात आल्यानंतर त्यांनी घराबाहेर धरणे आंदोलन सुरु केले. त्यानंतर पोलिसांनी अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले आहे.

लखनऊमध्ये त्यांच्या घराजवळ सपा प्रमुख अखिलेश यादव आंदोलनासाठी बसले होते. हजरतगंज पोलिसांनी अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले आहे. लखीमपूर खेरीला अखिलेश यादव जात असताना त्यांना उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशावर पोलिसांनी रोखले, असा दावा पक्षाने केला. त्यानंतर शेकडो सपा समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली.

पोलिसांच्या वाहनाला अखिलेश यादव यांच्या निवासस्थानाबाहेर आग लावण्याची घटना घडली आहे. ही घटना घटनास्थळापासून काही मीटर अंतरावर घडली, जिथे अखिलेश यादव त्याच्या निवासस्थानाजवळ आंदोलनासाठी बसले होते. एका व्हिडिओमध्ये, पोलिस आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. हे कोणी केले माहित नाही. आम्ही आत गेलो, तेव्हा कोणीतरी हे केले, असे एका पोलिसाने म्हटले आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments