R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश 'एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बदं होऊ द्यायच्या नाहीत - उद्धव ठाकरे

‘एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बदं होऊ द्यायच्या नाहीत – उद्धव ठाकरे

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या दीड वर्षांपासून बंद असलेली शाळा आता पुन्हा एकदा उघडली आहे. मुंबईसह राज्यात आज ८ ते १२ वर्गाच्या शाळा सुरु झाल्या. ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते इयत्ता १२ वीपर्यंतचे वर्ग भरतील तर शहरी भागात इयत्ता आठवी ते इयत्ता १२ वीचे वर्ग सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने आज शाळा पुन्हा एकदा गजबजल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधत शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी या कार्यक्रमाच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन झालं. यानंतर मुख्यममंत्र्यांनी विद्यार्थींशी संवाद साधला. आताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक काळा आता सुरु आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणं कठीण होतं, कारण मुलांची काळजी घेणं महत्त्वाचं होतं. खूपच काळजीपूर्वक घेत आज शाळेचं दार उघडलं आहे. हे भविष्याचं, विकासाचं दार उघडलं आहे, असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

शिक्षकांनी स्वत: बरोबर विद्यार्थ्यांकडेही लक्ष देणं गरजेचं आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी काही सूचना केल्या. शिक्षणाची जागा बंधिस्त असता कामा नये, दारं खिडक्या उघड्या असायला हव्यात, निर्जुंतुकीकरण करताना विद्यार्थी आसपास नाहीत याची काळजी घ्या, विद्यार्थी जिथे बसतील तिथे त्यांच्यात अंतर असलं पाहिजे, शौचालयांची स्वच्छता राखणं महत्त्वाचं आहे, असा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘एक प्रभाग एक उमेदवार’ निवडणूक पद्धतीला रिपाई’चा विरोध

  मुंबई | एक प्रभाग एक उमेदवार ही निवडणूक पद्धत योग्य असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्य सरकारने एक प्रभाग तीन सदस्य ही पद्धत लागू...

दिवाळीत पुणेकरांना मिळणार म्हाडाचं मोठं गिफ्ट, केली ‘ही’ मोठी घोषणा

  पुणे | यंदा पुणेकरांना म्हाडाकडून मोठे गिफ्ट मिळणार आहे. येन दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांना दिवाळीच्या मुहूर्तावर विशेष भेट मिळणार आहे. पुणे म्हाडाकडून दिवाळीत ३ हजाराहून...

एनसीबीकडून आर्यन खानचं काऊन्सिलिंग, मलिक म्हणतात व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवा

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता शारुख खान याचा मुलगा आर्यन खान याचे एनसीबी अधिकारी समीर वानखडे याने काल आर्थरोड जाईलमध्ये जाऊन काऊन्सिलिंग...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments