R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश पगार थकवला म्हणुन मालकाच्या गाडीला लावली आग

पगार थकवला म्हणुन मालकाच्या गाडीला लावली आग

 

पुणे | चिंचवडच्या एका बहाद्दराने मालकाने पगार थकवला म्हणुन थेट मालकाच्या दुचाकीला भररस्त्यात आग लावली आहे. ही घटना रविवारी पिंपरी-चिंचवड लिंक रोडवर असलेल्या प्रदिप स्विट्ससमोर घडली. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या आगीत गाडी पूर्णपणे जाळून खाक झाली होती.

समोर आलेल्या माहितीनुसारआरोपी अंकीत यादव हा गणेश उंदरे पाटील यांच्या सिमेंट ब्लाॅक बनवण्याच्या कारखान्यात कामाला होता. परंतू, मालकाने त्याचे कामाचे हक्काचे पैसे दिले नाही, सत्त्तागडा लावून सुद्धा मालक पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत होता. त्याचमुळे रागाच्या भरात आणि दारूच्या नशेत त्याने मालकाची गाडी पळवून ती भर रस्त्यात पेटवून दिली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्येच एका ड्रायव्हरने मालकाच्या गाडीला आग लावल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अशीच धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

…पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप !

  राज्यात आघाडीसह सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचे आरोप लगावले होते.तसेच त्यांच्या आरोपणानंतर अनेकांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी...

जनतेने नापास केले तरी तुम्ही सत्तेत, फडणीवसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

  मुंबई | मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख यांनी विरोधी पक्षावर तसेच सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. याला...

कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात संपन्न, अनेक मान्यवरांनी लावली उपस्थितीत

  कोल्हापुर | कोल्हापुरातील करवीरनगरीत पारंपरिक विजयादशमीचा सण ऐतिहासिक दसरा चौकात शाही थाटात आणि उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाले....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments