R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "मोदी सरकार आणि योगी सरकार बरखास्त करा"

“मोदी सरकार आणि योगी सरकार बरखास्त करा”

मुंबई | उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यनंतर राजकारण तापलं असून काँग्रेस प्रेदशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या केंद्रीतील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकार बरखास्त करा, अशी संतप्त मागणी नाना पटोले यांनी केली. नाना पटोले यांनी लखीमपूर घटनेच्या पार्शवभूमीवर मुंबईत पत्रकार परिषद घेत घटनेचा निषेध केला.

केंद्रातील नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचं सरकार बरखास्त करावं. शेतकरी हा देशाचा प्रमुख आहे. या शेतकऱ्याची विटंबना करण्याचा अधिकार भाजपला दिलेला नाही. जर त्यांना संपवण्याचा प्रयत्न जर सरकार करत असेल तर केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील मोदी सरकार बरखास्त करा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. तसंच, लखीमपूर खेरी हिंसाचाराचा महाराष्ट्र काँग्रेसकडून तीव्र निषेध करण्यात आला.

भाजप आणि उत्तर प्रदेशमधील सरकारने ठरवून केलेलं आहे. प्रियंका गांधी या तात्काळ निघाल्या परंतु त्यांना अडवण्यात आलं. त्या ठिकाणी तालिबानी सरकार आहे. तालिबानी व्यवस्था आहे. प्रियांका गांधी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सांत्वन देण्यासाठी जात असताना त्यांना अटक करुन ठेवलं आहे. या पद्धतीच्या तालिबानी शेतकरी विरोधी भाजपचं धिक्कार आणि निषेध करतो, असं नाना पटोले म्हणाले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments