R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश आर्यन खानचा मुक्काम तुरुंगात वाढला, आठही जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

आर्यन खानचा मुक्काम तुरुंगात वाढला, आठही जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

 

मुंबई | आभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावली आहे. आर्यनसह अरबाज मर्चंट, मुनमुन धमीजा, विक्रांत छोकर, इसमीत सिंह, नूपुर सारिका, गोमित चोप्रा आणि मोहक जसवाल यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. आर्यन खानसह आठ जणांविरुध्द अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एनडीपीएस) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आर्यन खान यांच्यावर सिद्ध झालेले गुन्हे अजामीनपात्र आहेत. आरोपी आणि सहआरोपींनी चौकशीत दिलेल्या माहितीमध्ये तफावत असल्याने याप्रकरणी अधिक चौकशीची गरज असल्याचे सांगत न्यायालयाने त्यांना एनसीबी कोठडी सुनावली. आर्यन खानच्या वतीने ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयात युक्तिवाद करत जामिनाची मागणी केली होती. परंतु ती न्यायालयाने फेटाळून लावली.

सध्या एनसीबीकडून आरोपींची चौकशी सुरू करण्यापूर्वी त्यांची पुन्हा एकदा वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. आवश्यकता भासल्यास त्यांना घटनास्थळीही नेऊन चौकशी केली जाईल. त्याचप्रमाणे जप्तीची कारवाईही होऊ शकते असे एनसीबीतील सूत्रांनी सांगितले. एनसीबीच्या पथकाने मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलवर उभ्या असलेल्या कॉर्डेलिया क्रूझवर आज पुन्हा छापा टाकला. तिथे एनसीबीला अंमली पदार्थ सापडले. क्रूझवरील ६ कर्मचाऱयांना त्याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची ‘पाकिस्तानी मैत्री’ भोवणार, पंजाब सरकारकडून चौकशीचे आदेश

  पंजाब | पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आता काॅंग्रेस विरोधात मोर्चा उघडला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन...

राज्यात पहिली ते चौथीचेही वर्ग भरणार; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आढावा

मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागच्या मार्च महिन्यापासून बंद आलेली महाविद्यालये आणि शाळा पुन्हा एकदा सुरु करण्यात आलेल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात कोरोनाच्या...

पालकमंत्री शोधून सापडत नाहीत, भाजपच्या या नेत्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला टोला

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांनी मंत्र्यांवर आणि आघाडीच्या नेत्यावर बेछुड आरो लगावले आहे. त्यातच आता माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी थेट आघाडीवर टीका...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

Recent Comments