R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "फक्त भाजपा आमदारांच्या मतदार संघात लॉकडाऊन लावला जातो"

“फक्त भाजपा आमदारांच्या मतदार संघात लॉकडाऊन लावला जातो”

 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील तब्बल ६१ गावांमध्ये लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. हा लाॅकडाऊन १० दिवसांसाठी असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. याच मुद्द्यावरून आता नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील हे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. त्यांनी स्थानिक आमदारांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही टीकास्त्र डागलं आहे.

भाजप आमदार सुजय विखेंनी नगर जिल्ह्यात लावण्यात आलेला लाॅकडाऊन हा अन्यायकारक असल्याचं म्हणत या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांना वाचवण्यासाठी अजित पवारांनी हा निर्णय लागू करायला लावला असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच जिल्ह्यात लाॅकडाऊन करण्याचा निर्णय कुणी घ्यायला लावला याबद्दल स्थानिक सत्ताधारी आमदारांनी उत्तर द्यावं, असं म्हणत फक्त भाजप आमदारांच्या मतदारसंघातच लाॅकडाऊन लावलं जातं असा गंभीर आरोप सुजय विखे यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात आकडेवारी लपवली जात असून सत्ताधाऱ्यांकडून होत असलेला अन्याय अजिबातच सहन केला जाणार नाही, अशा शब्दात सुजय विखेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. तसेच २ दिवसात निर्णयावर फेरविचार न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत त्यांनी या संदर्भातील निवेदन नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिलं आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

Recent Comments