R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या अनिल अंबानी,सचिन तेंडुलकर, जॅकी श्रॉफकडून मोठ्या प्रमाणात करचोरी !

अनिल अंबानी,सचिन तेंडुलकर, जॅकी श्रॉफकडून मोठ्या प्रमाणात करचोरी !

नवी दिल्ली | जगभरातील अतिश्रीमंतांनी परदेशांमध्ये केलेल्या गुंतवणुकीची पर्दाफाश पँडोरा पेपर्समुळे झाला आहे. इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टने हा गौप्यस्फोट केला आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेता जॅकी श्रॉफ, नीरा राडिया, किरण मजुमदार शॉ यांचे पती, फरार हिरे व्यापारी नीरव मोदीसह ३८० भारतीयांची नावे यात आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

स्वत:ला दिवाळखोर म्हणून जाहीर करणारे उद्योगपती अनिल अंबानी यांचाही यादीत समावेश आहे. दरम्यान, पँडोरा प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. काही उद्योगपती, सेलिब्रिटी, राजकारणी यांच्या परदेशात मालमत्ता व गुंतवणूक असल्याचे पँडोरा पेपर्समधून उघड झाले आहे. देशातील ३८० आणि पाकिस्तानातील ७०० नावांचा पँडोरा पेपर्समध्ये उल्लेख आहे.

या पेपर्समधून त्यांची करचुकवेगिरी व संशयास्पद आर्थिक व्यवहार उघड झाले आहेत. मात्र, अनेकांनी पँडोराचे दावे फेटाळले आहेत. सचिन तेंडुलकर व त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्समध्ये (बीव्हीआय) काही कंपन्या होत्या. पनामा पेपर्समध्ये त्यांचे नाव आल्यानंतर या कंपन्या विकल्याचा दावा पँडोरा पेपर्समधून करण्यात आला आहे. त्यावेळी एका शेअरचे मूल्य ९६ हजार डॉलर्स एवढे होते. सचिन यांच्या वकिलांनी हे आरोप फेटाळले आहेत.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments