R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मोदी-शहा देशातील लोकशाही संपवण्याचे काम केले, आघाडीचा केंद्र सरकारवर 'हल्लाबोल'

मोदी-शहा देशातील लोकशाही संपवण्याचे काम केले, आघाडीचा केंद्र सरकारवर ‘हल्लाबोल’

 

पुणे | लखीमपूर येथे शांततापूर्वक आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना मोदी सरकारच्या केंद्रीय राज्यमंत्री यांच्या ताफ्यातील वाहनांनी चिरडले. या घटनेच्या निषेधार्थ आज पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या चौकात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष तसंच विविध पक्षांच्या वतीने वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. जेंव्हा पासून मोदी-शहा सत्तेत आले आहेत तेंव्हापासून देशाची लोकशाही संपवण्याचे काम ते करत असल्याचा घणाघात प्रशांत जगताप यांनी केला.

उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथील हिंसक आणि अमानवीय कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व शहिद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी निषेध आंदोलन करण्यात आले होते. लखीमपूर घटनेने केवळ शेतकऱ्यांना नाही तर लोकशाहीला चिरडले आहे. रविवारी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे एका दौऱ्यावर जात असताना आंदोलक शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी केली व सरकारचा निषेध करत काळे झेंडे दाखवले.

मात्र शेतकरी करत असलेल्या आंदोलनांचा राग मनात धरून मिश्रा यांच्या मुलाने आंदोलक देशाचे अन्नदाते असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे पातक केले आहे. असे प्रशांत जगताप यांनी आंदोलनातील शहिद शेतकऱ्यांना श्रध्दांजली अर्पण करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments