R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या एनसीबी मोठ्या कारवाईच्या तयारीत; दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशचे अधिकारी मुंबईत

एनसीबी मोठ्या कारवाईच्या तयारीत; दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशचे अधिकारी मुंबईत

 

मुंबईच्या समुद्रात क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीच्या प्रकरणावरुन गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. एनसीबीने ड्रग्ज पार्टी उधळून लावत याप्रकरणात अटक केल्या गेलेल्या अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह दोघांना कोर्टानं ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अटकेत असलेल्या सर्व आरोपींच्या राहत्या घराची झाडाझडती घेण्याची तयारी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

क्रूझवर छापा टाकून अटकेची कारवाई करणारी एनसीबी आता आणखी मोठ्या ऑपरेशनच्या तयारीत आहे. त्यासाठी दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशचे अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे लवकरच एनसीबी मोठं ऑपरेशन करण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील एनसीबीच्या पथकानं क्रूझवर जाऊन धडक कारवाई केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सध्या सुरू आहे.

आर्यन खान आणि इतर आरोपींच्या चौकशीतून, त्यांच्या चॅटमधून काही जणांची नावं समोर येत आहेत. आरोपींची संख्या जास्त आणि मुंबईतील एनसीबीच्या अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्यानं दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशमधील एनसीबीच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं आहे. आर्यन खानला विविध ठिकाणी नेऊन स्पॉट व्हेरिफिकेशन केलं जाऊ शकतं. त्यामुळे शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याचीदेखील झडती घेतली जाऊ शकते.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments