R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या .......अखेर उत्तरप्रदेश पोलिसांच्या जनरकैदेत असलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना अटक

…….अखेर उत्तरप्रदेश पोलिसांच्या जनरकैदेत असलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना अटक

 

उत्तरप्रदेश | उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये गेल्या ३०तासांपेक्षा अधिक काळ नजरकैदेत असलेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियंका गांधी यांनी कलम १४४ चं उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नजरकैदेत ठेवलेल्या प्रियंका गांधींवर आता अटकेची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी रोष व्यक्त केला असून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

प्रियंका गांधी यांना थोड्याच वेळात कोर्टासमोर हजर केली जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी हवं तर मला अटक करावी, पण मी शेतकरी कुटुंबीयांना भेटल्याशिवाय परतणार नाही, अशी ठाम भूमिका प्रियंका गांधी यांनी घेतली आहे. याशिवाय आज प्रियंका यांनी एक व्हिडिओ देखील ट्विट केला होता. यात पंतप्रधान मोदींना त्यांनी घडलेल्या घटनेबाबत थेट सवाल विचारले आहेत.

“लखीमपूरला या आणि शेतकऱ्यांची अवस्था समजून घ्या. त्यांचं संरक्षण करणं हा तुमचा धर्म आहे. सगळ्यांच्या हक्कांचं रक्षण करणं हा संविधानाचा धर्म आहे. ज्यावर तुम्ही शपथ घेतली आणि त्याप्रती तुमचं कर्तव्य देखील आहे. जय हिंद..जय किसान”, असं ट्विट करत प्रियंका गांधी यांनी मोदींना उत्तर प्रदेशात येण्याचं आवाहन केलं होतं.

 

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

“हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे”

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याबाबत मुलीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

“हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे”

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याबाबत मुलीच्या...

Recent Comments