R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर अशी भूमिका शिवसेनेची

हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर अशी भूमिका शिवसेनेची

 

सोलापूर | राज्यात शिवसेना पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर २५ वर्ष जुने संबंध तोडुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. मात्र दुसरीकडे विरोधकांनी विविध मुद्दयावरून आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे सुरूच ठेवले होते. आता याच मुद्द्यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठरलेले लग्न मोडून कॉंग्रेस व राष्ट्रवादीबरोबर पळून गेली. शिवसेना – भाजप महायुतीने लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवली. त्यामध्ये जनतेने महायुतीला आशीर्वादही दिला. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर अशी भूमिका घेतली.

भाजपबरोबर ठरलेल लग्न, साखरपुड्यासकट मोडून हळदीच्या अंगाने शिवसेना पळून गेली अन्‌ मोकळी झाली. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या म्हणण्यानुसार शिवसेना जर स्वतंत्र निवडणूक लढली असती तर त्यांना कळलं असतं, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली.
आज रयत क्रांती संघटनेकडून उसाला एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानिमित्त सदाभाऊ खोत सोलापूरला आले आहेत. मोर्चापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments