R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "माझ्या मुलाविरोधात कोणतेही पुरावे समोर आले तर मी राज्य मंत्रीपदाचा देईल"

“माझ्या मुलाविरोधात कोणतेही पुरावे समोर आले तर मी राज्य मंत्रीपदाचा देईल”

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारात केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवली. या घटनेत ६ शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आशिष मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली . त्यानंतर पोलिसांनी आशिष मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यावर आता केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी जाहीर आव्हान केलं आहे.

लखीमपूर खीरी येथे अजय मिश्रा यांच्या मालकीच्या कारने शेतकऱ्यांना धडक दिली. त्यामध्ये एक गाडी अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा चालवत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला असला तरी यावर मिश्रा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारासंबंधित माझा मुलगा आशिष मिश्रा याच्याविरोधात कोणतेही पुरावे समोर आले तर मी राज्यमंत्रीपदाचा देईल, असं अजय मिश्रा यांनी सांगितलं आहे.

लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यृ झाला आहे. अजय मिश्रा यांनी असा दावा केला आहे, त्यांचा मुलगा आशिष मिश्रा हा हिंसाचार घडून आला तेव्हा तो दुसऱ्या कार्यक्रमाला उपस्थित होता. त्या कार्यक्रमाचे व्हिडीओ आणि फोटो पुरावे देखील आहेत. परंतु शेतकरी संघटनांनी असं म्हटलं आहे की मंत्र्यांच्याच मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली आहे. या घटनेची पुढील चौकशी आता पोलीस करत आहेत.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

“हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे”

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याबाबत मुलीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

“हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे”

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याबाबत मुलीच्या...

Recent Comments