R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आर्यन खानवर केलेल्या कारवाईवर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरची प्रतिक्रिया!

आर्यन खानवर केलेल्या कारवाईवर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरची प्रतिक्रिया!

 

मुंबई | कार्डेलिया क्रुझवर छापा टाकत एनसीबीच्या पथकानं शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह ८ जणांना ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणाची सगळीकडेच चर्चा होत असताना विशेष कौतुक होत आहे ते छापा टाकलेल्या एनसीबीच्या पथकाचं. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वखालीच एनसीबीच्या या टीमने क्रुझवरील ड्रग्ज पार्टीवर धाड टाकली होती.

समीर वानखेडेंच्या या कामगीरीचं पत्नी क्रांती रेडकरकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे. मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर तिच्या चित्रपटांमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे अनेकदा चर्चेत असते. क्रांतीने नुकतंच एका प्रसिद्ध वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी बोलताना तिने पती समीर वानखेडेच्या क्रुझवरील कामगिरीचं तोंडभरून कौतुक केलं.

समीर हा खूप मेहनती आहे. तो सध्या बॉलिवूडशी संबंधित ड्रग्ज प्रकरणं हाताळत असल्याने तो हायलाईट होत आहे. समीर अशा क्षेत्रात आहे जिथे त्याला एक मिनिटही बसायला वेळ नसतो. तो दररोज गुप्त ऑपरेशनसाठी काम करत असतो. तो जेव्हा गुप्त ऑपरेशनवर काम करत असतो किंवा चौकशी करत असतो, मी त्याला स्पेस देते. कारण मी त्याच्या कामाचा आदर करते. मला त्याच्या कामगिरीचा खूप अभिमान वाटतो असंही ती म्हटली.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

Recent Comments