R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home क्राइम अंधश्रद्धेने आणखी एका निष्पाप लहान बालकाचा घेतला जीव

अंधश्रद्धेने आणखी एका निष्पाप लहान बालकाचा घेतला जीव

 

कोल्हापूर | दोनच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या चुमकल्याचा मृतदेह घरापासून शंभर मीटरवर आढळून आल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील कापशी गावात मंगळवारी घडली आहे. मृतदेहावर हळद, कुंकू व गुलाल आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आरव राकेश केसरे असे या बालकाचे नाव आहे.

आरव रविवारी सायंकाळी मित्रांसह अंगणात खेळत असताना साडेसहानंतर तो अचानक बेपत्ता झाला होता. शोध घेऊनही रात्री उशिरापर्यंत तो न सापडल्याने नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्याचा सर्वत्र शोध घेतला जात होता. मात्र, आज पहाटे घरापासून शंभर मीटर अंतरावरच त्याचा मृतदेह आढळला. गळा दाबून खून करण्यात आल्याचे दिसून येत होते. शिवाय मृतदेहावर हळद, कुंकू आणि गुलाल टाकण्यात आल्याचे आढळल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते.

महिनाभरापूर्वी कागल तालुक्यात अपहरणातून बालकाचा खून झाला होता. नरबळीतून खून झाल्याची त्यावेळी चर्चा झाली होती. एकाला अटकही करण्यात आली असून, अजूनही त्या खुनाचे कारण स्पष्ट झाले नाही. त्यात आरवच्या खुनामुळे या घटनेचा तपास त्वरित करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

असंख्या महिलांना लागणे अमिश दाखून फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेच्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

  पुणे | देशभरातील शंभर महिलांना लग्नाचे आमिष देऊन फसविणाऱ्या भामट्याला अखेर पिंपरी- चिंचवडमध्ये अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला...

प्रवासी गाढ झोपेत असताना खासगी बस चालकाने जंगलात बस सोडली अन निघून गेला !

  मुंबई | कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावर धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली आहे. सिंधुदुर्गातील बांद्याहून मुंबईला येणाऱ्या काळभैरव ट्रॅव्हल्स या खासगी बसच्या...

विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरलेल्या आपल्याच पोटाच्या मुलाची केली हत्या !

  प्रेमामध्ये अडथळा ठरणार्‍या स्वत:च्या पोटच्या गोळ्याला आईने प्रियकराच्या मदतीने जीवे ठार मारल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी रात्री पोलिसांना घनसावंगी फाट्यावर मुलाचा मृतदेह सापडला.तालुक्यातील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments