R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'लूट' काँग्रेसच्या 'डीएनए' अर्थमंत्री सीतारामन यांनी साधला निशाणा

‘लूट’ काँग्रेसच्या ‘डीएनए’ अर्थमंत्री सीतारामन यांनी साधला निशाणा

केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यापासून विरोधात बसलेले काँग्रेस पक्ष विविध मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधताना दिसून आले आहे. तर भाजपकडून सुद्धा याला सडेतोड उत्तर देण्यात येते. आता पुन्हा एक्दाकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘लूट’ काँग्रेसच्या डीएनएमध्येच आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या प्रत्येक कार्यात त्यांना लूट दिसून येते, अशी टीका अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.

भाजपच्या प्रदेश कार्यालयात कुशाभाऊ ठाकरे परिसरात मंगळवारी एका कार्यक्रमात संबोधित करताना निर्मला सीतारमण यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात तयार झालेले केंद्र सरकारच्या विकासाचा सिद्धांत लोकांना केवळ अधिकार देणे नाही तर त्यांना सशक्त बनवणे हा देखील आहे. केंद्र सरकारच्या मुद्रिकरण योजनेतून सरकार देशाची लूट करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला त्यावर त्यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, ‘काँग्रेसच्या मनातून लूटेची भावना कधीच दूर होणार नाही. कारण त्यांच्या कार्यकाळात देशाची लूटच होत होती. त्यांच्या कार्यकाळात पाण्याची लूट, स्पेक्ट्रममध्ये लूट सर्व ठिकाणी लूटच होत होती. ते लूट करणारेच आहेत किंबहुना लूट त्यांच्या डिएनएमध्येच आहे’,असे म्हणत निर्मला सितारमण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments