R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आयपीएल सामन्यावर बेटिंग लावणाऱ्या राष्ट्रवादी नगरसेवकाच्या मुलाला अटक

आयपीएल सामन्यावर बेटिंग लावणाऱ्या राष्ट्रवादी नगरसेवकाच्या मुलाला अटक

 

कल्याण | आयपीएलच्या सामन्यावर बेटींग करणाऱ्या दोघांना उल्हासनगर क्राईम ब्रँचने अटक केली असून अटक केलेल्या आरोपींमध्ये एक आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचा मुलगा आहे. नगरसेवक सतरामदास जेसवानी यांचा मुलगा गिरीश हा चेन्नई विरुद्ध दिल्ली या सामन्यावर बेटींग लावत होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे.

समोर आलेली माहिती अशी की, उल्हासनगर क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना याविषयी माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी बुकी विशाल सावलानी याच्या ओटी सेक्शन परिसरातील घरी धाड टाकून क्रिकेट माझा या मोबाईल App च्या सहाय्याने सुरु असलेल्या बेटींगचा पर्दाफाश केला. बेटींगसाठी लागणारे मोबाईल व इतर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.

सदर आरोपांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्यांवर उल्हासनगरमधली ही दुसरी मोठी कारवाई मानली जात आहे. तसेच पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी सुरु केलेली आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments