R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पुन्हा एसटी चालकाची बसमध्ये बॅगला असलेल्या बेल्टच्या पट्ट्याने केली आत्महत्या

पुन्हा एसटी चालकाची बसमध्ये बॅगला असलेल्या बेल्टच्या पट्ट्याने केली आत्महत्या

नगर | नगर जिल्ह्यातील संगमनेर बस स्थानकात बसमध्येच ड्रायव्हरने आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं होत हे प्रकरण ताज असताना आता आणखी एक आत्महत्येची घटना घडली आहे. लातूर येथे एसटी बस चालकाने बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लातुर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात ही घटना उघडकीस आली आहे. संजय केसगिरे असं आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे.

उदगीर आगारात एसटी बस थांबलेली असताना एसटी बस चालक संजय केसगिरे यांनी स्वतःकडील बॅगचा बेल्ट काढून त्याच्या सहाय्याने गळफास घेतला. मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र तिथे पोहोचण्याच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला. संजय केसगिरे यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेले नाही. या घटनेने उदगीर आगारातील कर्मचाऱ्यांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संगमनेर बस स्थानकात एसटी बसमध्येच चालकाने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पाथर्डी-नाशिक बसच्या वाहन चालकाने बसमध्येच गळफास घेतला होता. पाथर्डी बस स्थानकातील चालक सुभाष तेलोरे यांनी आपलं आयुष्य संपवलं होतं. मुक्कामी थांबलेल्या बसमध्येच त्यांनी सकाळी गळफास घेतल्याचा आरोप झाला होता.
डोक्यावर कर्ज वाढल्याने सुभाष तेलोरे यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments