R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या केंद्रीय मंत्र्यांनं चक्क पवारांनाच भेट नाकारली, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण

केंद्रीय मंत्र्यांनं चक्क पवारांनाच भेट नाकारली, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण

 

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणानंतर आता देशभरातील सर्वच विरोधी पक्ष एकटवाले असून सर्वच पक्षाच्या नेत्यांनी उत्तर प्रदेश सरकारसह केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरु केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर लखीमपूर हिंसाचाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केलीय. देशातील शेतकरी हे कधीही विसरणार नाही, असं पवार म्हणाले. पवारांच्या या टीकेनंतर केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी शरद पवारांची भेट नाकारली कळतंय. त्यामुळे राजकीय विश्वात चर्चेला उधाण आलं आहे.

मंगळवारी दुपारी शरद पवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नियोजित भेट होणार होती. पण पियुष गोयल यांनी ऐनवेळी पवारांची भेट नाकारल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, गोयल यांनी पवारांची भेट का नाकारली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पण पवार यांनी लखीमपूर हिंसाचारावरुन केंद्र सरकार आणि भाजपवर केलेल्या टीकेनंतर ही भेट नाकारण्यात आल्याची चर्चा राजकीय विश्वात सुरु आहे.

लोकशाहीत शांततेत आपलं मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्याचं अधिकारानं लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी काही लोकांनी विशेषत, भाजप सरकारांमध्ये सत्तेत सहभागी असणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांनी शेतकऱ्यांवर गाडी चालवून दूर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही शेतकऱ्यांची हत्या झाली, आणखी काही लोकांची हत्या झाली आहे असं शरद पवार म्हणाले आहेत.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments