R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या काँग्रेस नेते राहुल गांधी लखमीपुरकडे रवाना, चरणजीत चन्नी आणि भूपेश बघेल त्यांच्यासोबत

काँग्रेस नेते राहुल गांधी लखमीपुरकडे रवाना, चरणजीत चन्नी आणि भूपेश बघेल त्यांच्यासोबत

 

 

लखमीपुर येथे शेतकऱ्यांबरोबर घडलेल्या घटनेनंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सध्या विरोधात या प्रकरणानंतर चांगलेच आक्रमक झाले आहे. त्यातच थोड्या वेळापूर्वी राहुल गांधी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीकडे रवाना झाले आहेत. सकाळीच त्यांनी पक्षाचे पाचसदस्यीय शिष्टमंडळ आज लखीमपूरला भेट देणार असल्याची माहिती दिली होती.

मात्र त्यांच्या दौऱ्यापूर्वीच उत्तर प्रदेश सरकारने राहुल गांधी आणि शिष्टमंडळाला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे . त्यानंतर त्यांना विमानतळावर अडवल्याची माहिती मिळाली होती. पण, आता अखेर ते लखनऊकडे रवाना झाले आहेत. सकाळी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत चरणजीत चन्नी आणि भूपेश बघेल यांच्यासोबत लखीमपूर खीरीला जात असल्याची माहिती दिली होती. यानंतर काँग्रेस नेत्यांना विमानतळावरच अडवल्याची माहिती समोर आली.

पण दुसरीकडे CISF कडून या वृत्तांचे खंडन करण्यात आले. आम्ही राहुल गांधींना अडवले नाही, त्यांचे विमान १२.४५ वाजता उड्डाण घेईल, असे CISF कडून सांगण्यात आले. त्यामुळे आता अखेर राहुल गांधी लखीमपूर खीरीमध्ये पीडितांना भेटण्यासाठी जात आहेत. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री चरनजीत चन्नी आणि छत्तीसगडे मुख्यमंत्री भुपेश बघेल आहेत. तर, सचिन पायलट वाहनाने तिकडे निघाले आहेत.

चन्नी आणि भूपेश बघेल यांच्यासोबत

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments