R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवारी ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद, सेवा समर्पण...

देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवारी ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद, सेवा समर्पण अभियानानिमित्त होणार कार्यक्रम

 

माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्या ७ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या राज्यभरातील शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व बूथ समिती सदस्य म्हणून काम करणाऱ्या सुमारे ८ लाख कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक रचना अधिक बळकट करण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील बूथ समित्यांची, शक्ती केंद्रांची रचना पूर्ण केली जात आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे सध्या समर्थ बूथ अभियान व सेवा – समर्पण अभियानानिमित्त राज्यभर वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत.

 

या पार्श्वभूमीवर फडणवीस हे शक्ती केंद्र व बूथ समिती प्रमुख तसेच बूथ समिती सदस्य म्हणून कार्यरत असणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पक्षाच्या संघटनात्मक कार्यक्रमांचा आढावाही श्री. फडणवीस यावेळी घेणार आहेत. एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्याने एकाच वेळी ८ लाख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा विक्रम या संवादाच्या माध्यमातून प्रस्थापित होणार आहे, असे श्री. उपाध्ये यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

समीर वानखेडेऐवजी दुसरा अधिकारी करणार आर्यन खान प्रकरणाचा तपास?

  मुंबई | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यावर अनेक स्वरूपाचे गंभीर आरोप लगावून एकच खळबळ उडवून दिली होती. मंत्री नवाब...

कामगारांच्या समस्या मांडून मनसे कामगार सेना कंपनीतून बाहेर पडताच शिवसेनेच्या कामगार संघटनेची कर्मचाऱ्यांना अरेरावी

  मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील वाद आता सर्वश्रुत आहेत. त्यात येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांमध्ये वाद होत असल्याचे चित्र...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments