R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद

लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद

 

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱयांना केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेविरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली. यानुसार ११ ऑक्टोबरला राज्यव्यापी बंद पाळला जाणार आहे.

लखीमपूरइतकी क्रूरतेची घटना आजपर्यंत कोणीही केलेली नाही. एकत्रच भूमिका घेतली आहे. एकत्र आहोत. लखीमपूरची घटना ही माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार आहे. शेतकऱयांच्या पाठीशी शिवसेना नेहमी राहिली आहे, त्यामुळे बंदमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, असं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर थोरात म्हणाले की, शेतकरी आंदोलन देशात शांततेत सुरू आहे त्याला वर्ष होईल. त्यांना भाजप चिरडत आहे. जनरल डायरची आठवण झाली.

उत्तर प्रदेश सरकार शेतकऱयांवर अत्याचार करणाऱया व्यक्तीला बेमुर्वतखोरपणे मोकळं सोडतंय. त्याचाही निषेध आवश्यक आहे. त्यासाठी हा बंद पुकारत आहोत. या बंददरम्यान अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील. रुग्णवाहिका, दूध आणि इतर आवश्यक वस्तूंची वाहतूक सोडून हा बंद पाळला जाईल. हा बंद सरकार म्हणून नसेल. महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने हा बंद पुकारण्यात येतोय, असे जयंत पाटील म्हणाले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments