R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या संभाजीराजे छत्रपती यांनी उस्मानाबादमध्ये केली नुकसानीची पाहणी

संभाजीराजे छत्रपती यांनी उस्मानाबादमध्ये केली नुकसानीची पाहणी

 

उस्मानाबाद | मराठवाडा आणि विदर्भात मागच्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या धो-धो पावसामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानाची आता खासदार छत्रपती संभाजीराजेंनी बुधवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी सुद्धा त्यांनी संवाद साधला होता.

सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे सरसकट मदत दिली पाहिजे त्यासाठी कॅबिनेट बैठक घ्यायला हवी, पहिली जबाबदारी राज्याकडून अपेक्षित , केंद्र सरकारकडे मागणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करून जास्तीत जास्त मागणी करून गरीब शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी उस्मानाबादमध्ये केली आहे.

खासदार छत्रपती संभाजीराजे महाराज यांनी भर पावसात उस्मानाबाद जिल्ह्यातील रामवाडी येथे अतिवृष्टी नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संभाजी महाराज शेतकऱ्यांच्या बांधावर आले असून मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मराठवाड्यात पाऊस कमी असतो. मात्र आता अतिवृष्टी झाल्यामुळे महाभयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.

तसेच शेतकऱ्यांची वाईट स्थिती झाल्याने सरकारने ताबडतोब NDRF च्या माध्यमातून सरसकट मदत करावी यासाठी लक्ष केंद्रित करावे , मागील वर्षी विमा पैसे मिळाले नाही. विमा कंपन्यांनी ग्रामसेवक यांचे अहवाल ग्राह्य धरले पाहिजेत. असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे. सरकारने यात लक्ष देऊन मराठवाड्यात सरसकट मदत युद्धपातळीवर करणे गरजेचे आहे, शेतीत पिकलेल्या सोयाबीनचा कुजून वास येत आहे. इतर विषय बाजूला ठेवून सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे केवळ मंत्री दौरे करून भागणार नाही सरकारी बाबूंनी मदत लवकर करावी अशी मागणी त्यांनी केली.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments