R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या एकनाथ खडसे यांच्या तब्येतीवर अंजली दमानियांनी उपस्थित केला सवाल

एकनाथ खडसे यांच्या तब्येतीवर अंजली दमानियांनी उपस्थित केला सवाल

 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मागे काही दिवसांपासून ईडीच्या कारवाईला समोरे जात आहेत. त्यातच ईडीच्या कारवाईनंतर तब्येत बिघडल्यामुळे खडसे हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. यावरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संशय व्यक्त केला असून, ते खरोखर रुग्णालयात दाखल आहेत का? असा प्रश्न त्यांनी ट्विट करून उपस्थित केला आहे. हा खोटेपणा असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.

दरम्यान, खडसेंना देण्यात आलेल्या अपंगत्वाच्या दाखल्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी येथील शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. तसेच खडसे यांचा अपंग दाखला रद्द करण्याच्या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी आंदोलन केले.

एकनाथ खडसे सोमवारी मुंबई येथे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. ते अतिदक्षता विभागात दाखल असून, त्यांच्यावर किडनीची शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगितले जात आहे. दमानिया यांनी ट्विट करीत म्हटले आहे हा खोटेपणाचा कळस आहे. न्यायालयासमोर हजर न राहण्यासाठी हे खोटे सांगितले जात आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments