R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या कोल्हापूर | जन्मदात्या बापानेच केला आपल्या ७ वर्षीय लेकराचा खून

कोल्हापूर | जन्मदात्या बापानेच केला आपल्या ७ वर्षीय लेकराचा खून

 

शाहूवाडी तालुक्यातील वारणा कापशी येथे रागाच्या भरात जन्मदात्या पित्याने ७ वर्षीय बालकाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. या खुनानंतर हा नरबळी असल्याचा दिखावा त्याने केला. मात्र ४८ तासात पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सदर प्रकार उघडीस आला होता या प्रकरणी बापाला अटक करण्यात आली आहे. शाहूवाडी तालुक्यातील वारणा कापशी येथे दोन दिवसापूर्वी एका बालकाचा मृतदेह आढळला. या मृतदेहावर हळदीकुंकू असल्याने हा नरबळीचा प्रकार असावा असा संशय व्यक्त होत होता. पण हा नरबळी नसून खुनाचाच प्रकार असल्याचे पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. दोन दिवसांनी तो नरबळी नसून बापानेच खून केल्याचे उघडकीस आले आहे.

राकेश केसरे व त्याच्या पत्नीमध्ये वारंवार वाद होत होता. पुन्हा एकदा या दोघांत वाद झाला. त्यानंतर पत्नी बाहेर गेली. राकेशने आईला बोलावून आण, असे आरवला सांगितले. त्याने नकार देताच संतापाच्या भरात राकेशने हातोडा फेकून मारला. हातोडा जोरात लागल्यामुळे आरव बेशुद्ध पडला. आपले बिंग बाहेर येऊ नये म्हणून राकेशने त्याचा गळा आवळून खून केला व मृतदेह लपवून ठेवला.

दुसऱ्या दिवशी त्या मृतदेहावर हळद कुंकू टाकून नरबळी असल्याचा बनाव केला. नरबळीचा संशय व्यक्त केल्याने गावात खळबळ उडाली. दोन दिवस पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे ,पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्यासह सर्वांनी तेथे ठाण मांडून चौकशी केली. त्यामध्ये जन्मदात्या बापानेच खून केल्याचे उघडकीस आले. घरात सापडलेल्या हतोड्यामुळे हा खुनाचा प्रकार उघडकीस आला

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments