R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शाहरूख खान एनसीबीचे पुढचे टार्गेट - नवाब मलिक.

शाहरूख खान एनसीबीचे पुढचे टार्गेट – नवाब मलिक.

 

मुंबई | भाजपचे लोक आधी सांगून तपास यंत्रणांच्या कारवाया होतात. याहून अधिक पुराव्यांची गरज नाही. भाजपचे लोक एनसीबीचे अधिकारी म्हणून लोकांना घेऊन जातात. तसेच एनसीबीचे लोक सरकारी साक्षीदार असल्याचे म्हणून सांगतात, म्हणजे कायद्याचे राज्य आहे की नाही, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आयटी विभागाने टाकलेल्या धाडींना आम्ही घाबरत नाही, असे उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले.

दीपिका पदुकोण, अर्जुन रामपाल, कॉमेडियन भारती, रिया चक्रवर्ती अशा अनेक सेलिब्रिटींना बोलावून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बसवून ठेवले. आता यापुढचे टार्गेट हे शाहरूख खान आहे. महिन्याभरापासून ही बातमी फिरत आहे. त्याच्या मुलाला गोव्यावरून आल्यानंतर अडकवण्यात आले आहे. एनसीबी आणि भाजपच्या संगनमताने बॉलिवुडला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. बऱ्याचशा लोकांच्या मनात निर्माण करून पैसे काढण्याचे हे उद्योग आहेत, असेही नवाब मलिक म्हणाले.

भाजपचे पदाधिकारी एनसीबीसोबत धाडी टाकतात ही गोष्ट म्हणजे भाजपच्या इशाऱ्यावर या कारवाया होत असल्याचे दिसून आले आहे. सामान्य कार्यकर्ते म्हणवणारा मनिष भानुशाली हा केंद्रीय मंत्र्यांसोबत कसा दिसतो ? माध्यमांना प्रतिक्रिया देतो ? हे सगळे अधिकारी कोणी दिले ? एकुण एनसीबी भाजपच्या इशाऱ्यावरून बॉलिवुडला बदनाम करत असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

Recent Comments