R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आयकर विभागाच्या कारवाईवर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिय

आयकर विभागाच्या कारवाईवर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिय

 

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कारखाने आणि औद्योगिक कंपन्या अशा एकूण ३५ ठिकाणी आयकर विभागाने आज सकाळी छापे टाकले. तसेच त्यांच्या बहिणींच्या घरावरही आयकर विभागाने छापे टाकण्यात आले आहेत. यात जरंडेश्वर साखर कारखाना, दौंड शुगर कारखाना, अंबालिका आणि नांदूर मधमेश्वर या ठिकाणच्या संचालकांवर आयकर विभागाने धडक कारवाई करत छापेमारी केली. आयकर विभागाने केलेल्या या धाडसत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

या धाडीचे स्पष्टीकरण देत पवार म्हणाले, “मी स्वतः राज्याचा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहे. त्यामुळे मी कर नियमित भरतो. त्याची शिस्त मी स्वतः लावून घेतली आहे. परंतु ज्या पद्धतीने हे सर्व चालू आहे. यावर जनतेने विचार करायला हवा,” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी यावेळी दिली. या कारवाईवर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्रावर टीका केली आहे.

तसेच, “एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करण्यात येतं हे मला काही कळत नाही. बँकेचा संबंध नसतानादेखील ईडीची नोटीस साहेबांना आली होती. चाळीस वर्षांपूर्वी माझ्या बहिणींची लग्न झाली. त्यांच्या घरावरदेखील छापे टाकण्यात आले. यामुळे आता या संपूर्ण घटनेचा जनतेने विचार करावा,” असे उद्गार पवार यांनी यावेळी केले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments