R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या लोण्याचा गोळा कोण मटकावतंय, हे आता त्यांच्या लक्षात आलं असावं - चंद्रकांत...

लोण्याचा गोळा कोण मटकावतंय, हे आता त्यांच्या लक्षात आलं असावं – चंद्रकांत पाटील

 

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत अनपेक्षित असे निकाल हाती आले असून भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर महाविकास आघाडीवर टीका केली. त्यांच्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेसबुक द्वारे पोस्ट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

फेसबुक पोस्टमध्ये पाटील यांनी म्हटले आहे की, ‘एकेकाळचा मित्रपक्ष शिवसेना मात्र या निवडणुकीत तिसऱ्या स्थानी गेल्याचं स्पष्ट झालंय. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्या पक्षावर ही वेळ यावी? लोण्याचा गोळा कोण मटकावतंय, हे आता त्यांच्या लक्षात आलं असावं. मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनभावना लक्षात घेण्याइतके सुज्ञ नक्कीच आहेत.’

तसेच ते पुढे लिहितात की, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल पाहता, जि.प. निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजपाच ठरला आहे. तर तीन पक्षांशी लढत असूनही पंचायत समितीतही भाजपाची कामगिरी दमदारच झालेली आहे. निकालाबद्दल मतदारांचे आभार, कार्यकर्त्यांचे अभिनंदन. आम्ही पुन्हा जोमाने कामाला लागू”

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने भाजपला जोरदार टक्कर दिली. झेडपी निकालात महाविकास आघाडी भाजपला वरचढ ठरली. ८५ जागांपैकी ४६ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. परंतु चारही पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला. ८५ जिल्हा परिषद जागांपैकी भाजपने सर्वाधिक २३ जागा जिंकल्या.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments