R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ओमकार बिल्डर आणि पवारांचे संबंध काय? किरीट सोमय्यां उपस्थित केला सवाल

ओमकार बिल्डर आणि पवारांचे संबंध काय? किरीट सोमय्यां उपस्थित केला सवाल

 

जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक, चालक आणि लाभार्थी कोण आहे? याचे अजित पवारांनी उत्तर द्यावे. २७ हजार शेतकऱ्यांनी हा कारखाना उभा केला. त्यांना मी भेटलो. त्यांना देखील या कारखान्याचा मालक कोण हाच प्रश्न आहे. पवारसाहेब राजकारण सोडून अर्थकारणावर बोला ना, असे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर त्यांचं सरकार होतं. त्यावेळी त्यांनी किती कारखाने घेतले. कारखान्यात किती शेतकरी भागधारक होते? जरंडेश्वर साखर कारखान्याचा सातबारा काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मालकीची लेयर ही पुढे पुढे जात आहे. खरं मालक चालक लाभार्थी हे अजित पवारांना माहिती आहे. ते का घोषित करत नाही. प्रश्न एका साखर कारखान्याचा नाही. ही मोडस ऑपरेंडी आहे, असेही किरीट सोमय्या म्हणाले.

मुंबई उच्च न्यायालयाने कारखान्याच्या चौकशीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्याची चौकशी दाबण्याचा ठाकरे सरकार प्रयत्न करत आहे. अजित पवारांनी हा साखर कारखाना बेनामी पद्धतीने घेतला. जरंडेश्वर कारखान्याकडे लक्ष का? असे म्हणत अजित पवार साताऱ्यात गेले होते. पण, माझा कारखाना असे ते सांगत नाही असे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविले होते.

तसेच रेकॉर्डमध्ये जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक तुरुंगात आहे. पण, खरा मालक बाहेर आहे. हा कारखाना गुरू कमोडिटी ओमकार बिल्डरने जरंडेश्वर साखर कारखान्याला लिजवर दिला होता. अजित पवार त्यांना दरवर्षी किती भाडं देतात हे देखील स्पष्ट करावे. अजित पवार आणि ओमकार बिल्डरचे संबंध काय? यावर शरद पवार आणि अजित पवार का बोलत नाहीत? त्यांची वकिली का करतात असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला .

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments