R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या काँग्रेसच्या माजी आमदाराच्या घरावर दगडफेक, बच्चू कडू यांच्या इशाऱ्यावर हल्ला झाल्याचा संशय

काँग्रेसच्या माजी आमदाराच्या घरावर दगडफेक, बच्चू कडू यांच्या इशाऱ्यावर हल्ला झाल्याचा संशय

 

अमरावती मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निकालानंतर राजकारण तापताना दिसून येत असून आता हाणामारीचे प्रकार समोर येत आहे. त्यातच माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर प्रहार कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची घटना उघडकीस आली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने हा हल्ला केल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर गुरुवारी सकाळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत हल्ला केला आणि त्यांच्या घरासमोर पुतळा जाळल्याचा आरोप आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निकालाच्या जल्लोषात काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आईबद्दल अपशब्द काढल्याचा आरोप करत प्रहार कार्यकर्त्यांनी बँकेचे संचालक आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर हल्ला केला.

जिल्हा बँकेत पराभव झाला, म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू यांनीच हल्ला करायला लावल्याचा आरोप वीरेंद्र जगताप यांनी केला, माझ्यावर हल्ला करुन घर पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचाही गंभीर आरोप वीरेंद्र जगताप यांनी केला. हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्याचा पुढील तपास चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन करत आहेत.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments