R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home देश केंद्रात मंत्री असूनही नारायण राणे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान नाही

केंद्रात मंत्री असूनही नारायण राणे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान नाही

 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून आपली नवी टीम जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, माजी मंत्री प्रकाश जावडेकर, विनय सहस्रबुद्धे, राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून भाजपात आलेल्या चित्रा वाघ यांना संधी देण्यात आली आहे. मात्र केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद व ज्येष्ठ नेते असूनही नारायण राणे यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपमध्ये नारायण राणे वेटिंगवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या नव्या टीममध्ये महाराष्ट्रातून तब्बल 15 जणांना संधी देण्यात आली आहे. माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्याबरोबरच सुनील देवधर यांच्याकडे पुन्हा एकदा राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी मंत्री आशीष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांना विशेष निमंत्रित म्हणून कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे.

तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश आहे. मागील कार्यकारिणीत सचिव पदाची जबाबदारी असणाऱया विजया रहाटकर यांना पुन्हा संधी देण्यात आलेली नाही.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतं, काँग्रेसची जळजळीत टीका

  सध्या कर्नाटकात पोट निवडणुकीच्या जोरदार प्रचार सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडायला सुरवात केली आहे. मात्र आता या पोट निवडणुकीच्या...

” देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये.” केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे.

  राज्यातील वीज उत्पादन संकटास केन्द्र सरकारकडून कोळसा पुरवठा होत नसल्याचे कारण देऊन करण्यात येत असलेल्या आरोपात अजिबात सत्यता नाही. केन्द्र सरकारने राज्य सरकारला पावसाळा...

“लाठ्या-काठ्या उचला. आक्रमक शेतकऱ्यांना तुम्हीही त्याच भाषेत उत्तर द्या” मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांचे वादग्रस्त विधान

  केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या दीड वर्षांपासून केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. अशातच आता आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments