R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आर्यन खान प्रकरणात नवी माहिती समोर, साक्षीदार निघाला आरोप

आर्यन खान प्रकरणात नवी माहिती समोर, साक्षीदार निघाला आरोप

 

मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीनं अटक केली आहे. मुंबई क्रुझवर टाकलेल्या छाप्यात त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान झालेल्या खुलास्यांमुळे त्याला अटक करण्यात आलं. अशातच काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं आर्यन खानसह ७ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता आर्यन खानच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे.

आर्यन खानच्या अटकेनंतर त्याला सोबत घेऊन जाताना किरण प्रकाश गोसावी आणि भाजपचे नेते मनीष भानुशाली उपस्थित होते. यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. गोसावी या प्रकरणातील साक्षीदार आहे मात्र आता गोसावी एनसीबीच्या अडचणी वाढवताना दिसत आहे.

गोसावीच्या विरुद्ध मुंबईसह आणखी तीन फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली आहे. तर एकामध्ये तो अद्यापही फरार असल्याचं रेकॉर्डवर आहे. त्यामुळे या प्रकरणाचा साक्षीदारच फरारी आरोपी निघाला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments