R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या छापा टाकणे हा अधिकाराचा अतिरेक आहे, शरद पवारांची केंद्रावर टीका

छापा टाकणे हा अधिकाराचा अतिरेक आहे, शरद पवारांची केंद्रावर टीका

 

आयकर विभागाच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, तसेच त्यांचा पुत्र पार्थ पावर यांच्या मुंबईतील कार्यालयावर छापे टाकरण्यात आले. आयकर विभागाच्या छाप्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यश शरद पवार यांनी आयकर विभागाच्या कारवाईवर निशाणा साधला आहे. कर वसुली करण्यासाठी जर कोणाला काही शंका येत असेल तर त्यासंबंधीच्या चौकशी करण्याचा अधिकार आहे. मात्र, या व्यवहाराशी संबंध नसलेल्या मुलींवरही छापे टाकणे हा या अधिकाराचा अतिरेक आहे,’ असे पवार यांनी म्हंटले आहे.

आयकर विभागाच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत या कारवाईच्या मुद्द्यावरून केंद्रावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले, ‘आयकर विभागाने विविध ठिकाणी कारवाई केली आहे. या कारवाईनंतर अजित पवार यांनी त्यावर मत व्यक्त केले आहे. आयकर विभागाने आपल्याला अधिकार दिला आहे म्हणून त्या अधिकाराचा वापर कुणासंदर्भात करायचा याचाही विचार करणे गरजेचे आहे.

‘आज जे काही घडलं ते उत्तर प्रदेशच्या प्रश्नावर माझ्यासह विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे घडत आहे. शेतकरी आपली भूमिका मांडण्यासाठी जात असताना सत्ताधारी पक्षातील नेत्यांची वाहने त्यांच्या अंगावर जातात. आयकर विभागानेही चौकशी करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. काही संस्था किंवा त्याच्याशी संबंधित प्रमुख असतील त्यांच्यासाठी चौकशी केली जात असेल तर काही हरकत नाही मात्र, या व्यवहाराशी संबंध नसलेल्या मुलींवरही छापे टाकणे हा या अधिकाराचा अतिरेक आहे असे पवार यांनी म्हंटले आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments