R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया "आदित्य ठाकरे यांचा तत्कालीन फडणवीस सरकारला जोरदार टोला"

“आदित्य ठाकरे यांचा तत्कालीन फडणवीस सरकारला जोरदार टोला”

 

मुंबई | मुंबईतील विक्रोळीमधील संक्रमण शिबिरामध्ये राहणाऱ्या ४११ कुटुंबियांच्या नवीन घरांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात लाभधारकांना घरांच्या चाव्यांचं वाटप पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी या दोन्ही नेत्यांनी जोरदार टोलेबाजी करत विरोधकांना टोला लगावला होता.

यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी मागील पाच वर्षात राज्यातील सरकार सांभाळणाऱ्या फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मागील सरकारने पाच वर्षात फक्त गाजर वाटपाचा कार्यक्रम केला आहे. मात्र, आम्ही तुम्हाला चावी वाटपाचा कार्यक्रम करत आहोत, असं नाव न घेता थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंनी टोला लगावला होता.

देशात कितीही मोठे मोठे फटाके वाजत असले तरी, शिवसेनेचा आवाज कोणीच दाबू शकत नाही. देशातील पण वातावरण बदलायचं आहे. इतर पक्ष चावी मारण्याचं काम करत असतात. मात्र, आम्ही चावी वाटपाचे काम करत आहोत. तसेच, शब्द दिलेला असतो आणि तो पाळायचा असतो. शब्दाचे वाटप होऊ शकत नाही, असा चिमटा आदित्य ठाकरेंनी भाजपला घेतला.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

प्रदूषण थांबले नाही, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जाईल !

  नवी दिल्ली | सध्याच्या गतीने ज्या प्रकारे कार्बन उत्सर्जन चालू आहे, ते तसेच चालू राहिले, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जातील. ही शहरे...

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments