R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति झेडपीला शिवसेनेला झटका, मग मुंबई पालिका कशी लढणार? राऊत म्हणतात की,

झेडपीला शिवसेनेला झटका, मग मुंबई पालिका कशी लढणार? राऊत म्हणतात की,

 

मुंबई | दोनच दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या जिल्हापरिषद आणि पंच्यात समितीच्या निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला जोरदार झटका बसला. त्यामुळे शिवसेनेचं टेन्शन वाढलं आहे. या निकालानंतर शिवसेना पालिका निवडणुकीला कशी सामोरे जाणार याबाबतच्या उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. त्यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना महापालिका निवडणुकीवर भाष्य केलं आहे. मुंबईत शिवसेनेचा विस्तार व्हावा ही शिवसेनेची भूमिका कायम आहे. म्हणून शिवसेना स्वबळावर लढत आहे. आम्ही स्वबळावर लढलो. शिवसेना मोठा पक्ष आहे. शंभरीपेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी आम्ही नक्कीच तयारी करतोय असे राऊत यांनी बोलून दाखविले होते.

तसेच ते म्हणाले की, मुंबई महापालिकेत शिवसेनेचीच ताकद असेल. मुंबईत शिवसेनेचाच महापौर होईल. पाच वर्षांपूर्वी निवडणूक ही आमच्या ताकदीवर आम्ही लढलो, असं त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे महापालिका निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र युतीमध्ये लढणार की स्वबळावर हे अद्याप स्पष्ट केलेलं नाहीये.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

नवाब मलिक यांच्याकडे समीर वानखेडेंच्या विरोधात पुरावे असतील

  मुंबई | अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला एनसीबी अटक केल्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती तसेच राज्याच्या राजकारणात सुद्धा एकाच खळबळ माजली होती. त्यातच...

‘नुसते मंत्रालय म्हणू नका, ते तर बंद आहे’ नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

  मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीयांनी ठाकरे परिवार आणि शविसेना पक्षावर घणाघाती टीका केलेली दिसून आहे. त्यातच मालवण येथे केलेल्या विधानावरून...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments