R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home खेळ टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या नीरज चोप्राच्या भाल्याला १ कोटी ५० हजारांची बोली

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या नीरज चोप्राच्या भाल्याला १ कोटी ५० हजारांची बोली

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशविदेशातील पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या नीरज चोप्रा या खेळाडूच्या भाल्यासाठी सर्वाधिक १ कोटी ५० हजार रुपयांची बोली लावण्यात आली आहे. पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंपैकी ऐतिहासिक व धार्मिक महत्वाच्या वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा जास्त कल आहे.

पॅरालिम्पिकमध्ये भारताचा सुवर्णपदक विजेता खेळाडू सुमित अंतील याने वापरलेल्या भाल्याची लिलावात मूळ बोली १ कोटी रुपयांची होती. आता या रकमेत वाढ होऊन ती १ कोटी २० हजार रुपये झाली आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावात बोली लावण्याची मुदत गुरुवारी संध्याकाळी संपली. या लिलावाला १७ सप्टेंबर रोजी सुरुवात झाली होती. या लिलावातून मिळणारा निधी नमामी गंगे प्रकल्पाला देण्यात येईल.

पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंशी संबंधित वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे. टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा याने ज्या भाल्याच्या साहाय्याने सुवर्णपदक जिंकले, त्या भाल्यावर त्याने आपली स्वाक्षरी केली व तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिला होता. नीरज चोप्राच्या भाल्याला १० कोटी रुपयांची बोली ४ ऑक्टोबर रोजी लावण्यात आली होती. मात्र ही बोली बनावट असल्याचा संशय आल्याने ती रद्द करण्यात आली.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

मनोज पाटील प्रकरणात मनसेची उडी, साहिल खान याला दिला ‘हा’ इशारा !

  मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटील याने काल विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मनोज पाटील याने यावेळी आपल्या सुसाईड नोटमध्ये, अभिनेता साहिल...

विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांचं मोठं विधान !

  नवी दिल्ली | टी -२० विश्वचषकापूर्वी विराट कोहलीचे कर्णधारपद पुन्हा एकदा चर्चेत आले असून आयसीसी वर्ल्ड टी २० नंतरविराट कोहली टी -२० आणि एकदिवसीय...

मुंबईही ‘या’ दिवशी युएईला होणार रवाना, पहिल्याच सामन्यात असतील आमने सामने

  मागाच्या वर्षीप्रमाणे आयपीएल विजेता संघ मुंबई इंडियन्सही शुक्रवारी दुबईला रवाना होण्याच्या तयारीत आहे. दोन्ही संघ १९ सप्टेंबरला युएईमध्ये आयपीएलच्या १४ व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments