R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या अटक न करता फक्त नोटीस का? सुप्रीम कोर्टाचा योगी सरकारला सवाल

अटक न करता फक्त नोटीस का? सुप्रीम कोर्टाचा योगी सरकारला सवाल

 

लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा अद्याप चौकशीसाठी हजर झालेला नाही. त्याच्या घरी नोटिस पाठवून हजर होण्यास सांगण्यात आलं होतं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणात जी काही पावले उचलली ती समाधानकारक नसल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने सत्तात असलेल्या योगी सरकारला फटकारलं आहे.

तसेच राज्य सरकारने डीजीपींनी या प्रकरणातील पुरावे सुरक्षित ठेवावेत असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त करत विचारलं की, तुम्ही काय संदेश देणार आहात? ३०२ मधील गुन्ह्यात पोलिस काय करतात? थेट अटकच केली जाते ना, आरोपी कोणीही असला तरी आपण कायद्याने काम करायला हवं असंही न्यायालयाने सुनावलं होत. तसेच दबावाखाली काम न करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारच्यावतीने वकील हरिश साळवे यांनी न्यायालयात सांगितलं की, ‘शेतकऱ्यांच्या शवविच्छेदन अहवालात गोळी लागून मृत्यू झाल्याचं समोर आलेलं नाही. घटनास्थळी रिकामे काडतूस सापडले होते. संशयित आरोपी आशिष मिश्रा यांना नोटिस पाठवण्यात आली होती आणि आज कोर्टात हजर राहणार होते. मात्र त्यांनी उद्या सकाळपर्यंतचा वेळ मागितला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने विचारलं की, जबाबदार सरकार आणि प्रशासन इतक्या गंभीर आरोपावर असं का वागत आहे? असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला होता.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments