R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिवसेनेचा स्वबळाचा नारा मुंबईत भाजपा-राष्ट्रवादी आणि काँग्रेसला देणार टक्कर

शिवसेनेचा स्वबळाचा नारा मुंबईत भाजपा-राष्ट्रवादी आणि काँग्रेसला देणार टक्कर

 

मुंबई | मुंबई महानगर पालिका निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी सुरवात केली आहे. यातच आता शिवसेना पक्षाने स्वबळाची नारा देऊन सर्वच पक्षांच्या विरोधात मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत १०० पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. मुंबईत शिवसेनेचा विस्तार व्हावा ही पक्षाची भूमिका कायम आहे म्हणून शिवसेना स्वबळावर लढत आहे. मागील पालिका निवडणूक ही आमच्या ताकदीवर लढल्याचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या भूमिकेबद्दल राऊत म्हणाले की, मुंबईत शिवसेनेचा जन्म झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे राज्य नसेल तर कुणाचे राज्य असेल, असा दावा करतानाच पालिकेत शिवसेनेचाच महापौर असेल, असा दावाही त्यांनी केला. शिवसेनेच्या दसरा मेळाव्या संदर्भात राऊत म्हणाले की, यंदाचा दसरा मेळावा दणक्यात होईल. हा देखील सांस्कृतिक उत्सव आहे. मुख्यमंत्र्यांनीही दसरा मेळावा घेण्याचे ठरविले आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. फटाके वगैरे फोडून जल्लोषात हा दसरा मेळावा होईल, असे राऊत म्हणाले.

मंदिरे उघडली आहेत, नियम पाळून सण साजरे होत आहेत. दसरा मेळावाही होईल, असे सांगतानाच मेळावा कुठे होणार हे आता सांगू शकत नाही, असेही राऊत म्हणाले. त्यामुळे यंदाचा शिवसेना मेळावा कुठे होणार याबाबत चर्चा सुरू आहे. मागील वर्षी दादर येथील राष्ट्रीय सावरकर स्मारकाच्या सभागृहात हा मेळावा झाला होता. तर, यंदा षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments